⚡मालवण ता.१६-:
मालवणमधील दोन विद्यार्थ्यांची गोवा येथील खेलो इंडिया एक्सलन्स सेंटरसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये जय गणेश स्कूलची विद्यार्थीनी प्राची चव्हाण व टोपीवाला हायस्कूलचा विद्यार्थी गोरेश घाडीगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
मालवण येथील संस्कार टेबल टेनिस हॉलच्या विद्यार्थ्यांची खेलो इंडिया एक्सलन्स सेंटरसाठी निवड करण्यात आल्याने प्राची व गोरेश यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या खेळामध्ये आजपर्यंत विभागस्तर, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशामुळे त्यांची ही निवड झाली आहे. या दोन विद्यार्थ्यांना प्रशिक्षक चंद्रकांत साळवी यांनी मार्गदर्शन केले.