*लॉक डाऊनचा काळात जोपासला चित्रकलेचा छंद…

.*चौथीत शिकणाऱ्या सोहम कोरगावकरचे आदर्शवत काम*

*💫बांदा दि.२५-:* गेल्या मार्च २०२०पासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत या कालावधीत विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे तसेच बाहेर जाऊन मित्रांमध्ये खेळणेही बंद झाले .मोबाईल ,लॅपटॉप टीव्ही यांचा अतिवापराने आरोग्यावर वाईट दुष्परिणाम होतात. या सगळ्यापासन दूर राहून बालपणापासूनच चित्रकलेचा छंद सोहम बापूशेट कोरगावकर या विद्यार्थ्यांने जोपासला आहे. सोहम कोरगावकर हा सावंतवाडी तालुक्यातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय चराटे नं.१शाळेत इयत्ता चौथी इयत्तेत शिकत असून लहानपणापासून त्याला चित्रकलेची आवड आहे. आतापर्यंत सोहमने विविध चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन तालुका व जिल्हा पातळीवर सुयश प्राप्त केले आहे. व्यक्तिचित्र रेखाटन्यात सोहमचा हातखंडा आहे .त्याचबरोबर विविध प्रकारची निसर्गचित्र व सण उत्सव यावर आधारित चित्रांचे आकर्षक रेखाटन त्याने केले आहे.विविध कार्टून, देवदेवता, विविध क्रिकेटपटू यांची देखील चित्रे त्याने रेखाटली आहे. करोना जनजागृतीसाठी देखील सोहमने विविध प्रकारची चित्रे रेखाटली आहेत. याचबरोबर वाॅलपेंटीगचे कामही आकर्षक तो करतो. सोहमला या छंदाला लाॅकडाऊन उभारी देण्याचे काम पेशाने शिक्षक असलेल्या बापूशेट कोरगावकर व साक्षी कोरगावकर या शिक्षक दाम्पत्याने केले आहे.

You cannot copy content of this page