*सिंधुदुर्गला लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्या

*आमदार नितेश राणे यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी*

*💫कणकवली दि.२५-:* १मे२०२१ पासून १८वर्षावरील तरुणांसाठी कोवीड १९चे लसीकरण सुरू करण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात यावा,अशी मागणी भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्हयात सद्यस्थितीत लसीचा तुटवडा जाणवत असून साडेसात लाखाहून अधिक लस सिंधुदुर्ग जिल्हयासाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी श्री राणे यांनी आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले.

You cannot copy content of this page