जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन : डाॅ अजय स्वार व डाॅ मिलिंद खानोलकर यांनी घेतला पुढाकार
*💫सावंतवाडी दि.२५ प्रसन्न गोंदावळे-:* कारीवडे बोर्डी पूल नजिक हाॅटेल अनंत पॅलेस येथे कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी कोवीड रुग्णालय आज पासून सुरु करण्यात आले आहे. सावंतवाडीतील डाॅ अजय स्वार व डाॅ मिलिंद खानोलकर यांनी हे रुग्णालय सुरु केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याहस्ते आज रविवारी या रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजु परब, प्राताधिकारी सुशांत खांडेकर, , डाॅ.अजय स्वार, डॉ.मिलींद खानोलकर, डाॅ.उमेश मसुरकर आदी उपस्थित होते. रुग्णालयात १६ ऑक्सिजन बेड, दोन वेंटीलेटर बेड, चार नॉन ऑक्सीजन बेड, स्टाफ, डाॅक्टर उपलब्ध असणार आहेत. अशी माहिती डॉ. स्वार यांनी दिली आहे. डॉ. स्वार आणि डॉ. खानोलकर यांच्या या रुग्णालयामुळे रुग्णांची ओरोसला होणारी धावपळ थांबणार आहे.
