बिडवाडी उपसरपंच सुदाम तेलींच्या सौजन्याने विविध उपक्रम..
कणकवली : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बिडवाडी गावचे उपसरपंच सुदाम तेली यांच्या सौजन्याने छावा सिनेमा मोफत दाखविण्यात येणार आहे. १० एप्रिल हा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस बिडवाडी गावात विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. १० एप्रिल रोजी रात्री ८ वाजता बिडवाडी मगरवाडी येथे छावा सिनेमा एलईडी स्क्रीनवर मोफत दाखविण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा महाराष्ट्र सह देशात आणि विदेशात सुद्धा अत्यंत गाजला असून छत्रपती संभाजी राजांचा जीवनपट या सिनेमातून बिडवाडी तील समस्त ग्रामस्थांना पाहता यावा यासाठी सिनेमा दाखवण्यात येणार असल्याचे उपसरपंच तेली यांनी सांगितले. खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बिडवाडी गावातील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसोबत केक कापून खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.