मालवण दि प्रतिनिधी
समाजात बरीचशी व्यक्तिमत्व निर्माण होतात व काळाच्या पडद्याआड जातात पण त्यांनी केलेल्या कार्याने ते अजरामर होतात. डॉ.चंद्रकांत विठ्ठल वराडकर तथा दादासाहेब वराडकर हे असेच व्यक्तिमत्व होते. कला, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय होते, त्यामुळे त्यांनी मिळवलेली ख्याती कौतुकास्पद असून आपल्याला भविष्यातील वाटचाल करताना मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. सुनील नाईक यांनी येथे बोलताना केले
कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये माजी सभापती आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कै. डॉ. चंद्रकांत विठ्ठल वराडकर तथा दादासाहेब वराडकर यांच्या 99 जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचा पारितोषिक वितरणही पार पडले यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर, पर्यवेक्षक श्री. महेश भाट सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सचिव श्रीमती विजयश्री देसाई मॅडम यांनी डॉ. दादासाहेब वराडकर हे सर्व कलासंपन्न व्यक्तिमत्व तसेच डॉक्टर क्षेत्रातील कर्तव्य पार पाडताना सामाजिक कार्यात अग्रेसर, राजकीय क्षेत्रात दबदबा असणारे व्यक्तिमत्व होते. त्यांना मिळालेला वारसा, ज्ञान, गुणसंपन्न लाभलेली व्यक्तिमत्वे व त्यांच्यावर झालेले डॉक्टर काका साहेबांचे संस्कार यांच्यामुळे त्यांनी आपल्या जीवनात प्रामाणिकपणे कार्य केले. कट्टा दशक्रोशीतील एक नामवंत व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले. अशी व्यक्तिमत्त्वे निर्माण झाली व त्यांचा वारसा चालवण्याचे कार्य आपणास मिळाले त्यामध्ये आपण धन्य असून हीच प्रेरणा घेऊन आपण वाटचाल करूया असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने निबंध लेखन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी काढलेल्या डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या व्यक्तिचित्रणाचे प्रदर्शन भरवण्यात आले. कला शिक्षक श्री. समीर चांदरकर सर यांनी कार्यशाळेतून चित्रकलेचे सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी होते.
प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्री. किसन हडलेकर सर यांनी केले.