मालवणातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

भाऊ सामंत, प्रशांत हिंदळेकर यांनी मानले मालवण वासियांचे आभार..

मालवण (प्रतिनिधी)

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने गेली २२ वर्षे मालवण शहारात गुढीपाडव्याचे औचित्य साधून काढण्यात येत असलेल्या भव्यदिव्य स्वरूपातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे स्वरूप दरवर्षी वाढत जाणारे आहे. या वर्षीही मोठा प्रतिसाद स्वागत यात्रेला लाभला. हे सर्वांच्या सहभागातील सांघिक यश आहे. प्रत्येकाला आपली वाटावी अशी ही स्वागत यात्रा ठरते, असे सांगत हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणचे संस्थापक भाऊ सामंत व संयोजक प्रशांत हिंदळेकर यांनी सर्व सहभागींचे व मालवण वासियांचे आभार मानले आहेत.

विविध चित्ररथ, वेशभुषा स्पर्धा, ढोल-झांज पथक, तुतारी वादक यांनी या स्वागतयात्रेत रंगत आणली. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला, पुरुष आणि वेशभूषेतील बच्चेकंपनी हे सर्व स्वागत यात्रेचे आकर्षण ठरले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या संयोजनाखाली कांदळगाव येथील महापुरुष ठिकाणदार महिला मंडळाच्या रोंबाट सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः मालवणात यावर्षी होळी उत्सवात प्रथमच कांदळगावच्या महापुरुष ठिकाणदार महिला मंडळाने रोंबाटाचा देखणा कार्यक्रम सादर केला महिलांनी सादर केलेल्या या रोंबाट कार्यक्रमाचे अनेकांनि कौतुक केले मालवणच्या सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा यतीन खोत यांच्या संयोजनाखाली या महिला मंडळांनी सादर केलेल्या रोंबाटाला नववर्ष स्वागत यात्रेत खास आमंत्रित करण्यात आले होते कांदळगाव येथील महापुरुष ठिकाणदार महिला मंडळाच्या रोंबाटा चा कार्यक्रम हा लक्ष्यवेधी ठरला

आचरा स्वराज्य तथा यशराज प्रेरणा ग्रुप पहिल्यांदा सहभागी झाले. त्यासोबत गुजराती समाजाच्या महिला व पुरुष पारंपरिक वेशभुषासह मोठया संख्येने स्वागत यात्रेत सहभागी झाले. एकूणच मालवण वासियांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची आणि एकसंघ भावनेची ही यात्रा आपली ओळख बनवत आहे.

यावर्षी स्वागत यात्रा समितीच्या वतीने सणउत्सव या संकल्पनेवर आधारित शालेय रंगभरणं स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेलाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. शहर परिसरातील शाळांमधून सुमारे दोन हजार विध्यार्थ्यांचा सहभाग स्पर्धेला लाभला. स्पर्धेला लाभलेला प्रतिसाद पाहता पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा तालुका सतरावर आयोजित करण्याचा मानस भाऊ सामंत, प्रशांत हिंदळेकर यांनी व्यक्त केला आहे.

शालेय आणि खुल्या अश्या विविध गटात घेतल्या गेलेल्या वेशभुषा स्पर्धाही यावेळी लक्षवेधी ठरल्या. या स्पर्धानाही मोठा प्रतिसाद लाभला. दोनशे पेक्षा जास्त स्पर्धाकांचा सहभाग यात होता. एकूणच दरवर्षी वाढत जाणारे यात्रेचे स्वरूप नागरिकांचा वाढता सहभाग पाहता ही स्वागत यात्रा आगामी काळातही सर्वांच्या सहभागातून आणि सहकार्यातून अधिकाधिक भव्य दिव्य करूया, असेही भाऊ सामंत, प्रशांत हिंदळेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page