भगवा ध्वज म्हणजे हिंदू धर्माचे प्रतीक …

स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक अर्जुन चांदेकर..

⚡बांदा ता.३१-: भगवा ध्वज हा सनातनी हिंदू धर्माचे प्रतीक आहे. शूरता, पराक्रम, त्याग म्हणजेच हा भगवा ध्वज आहे. या ध्वजाला हजारो वर्षांची परंपरा आहे. या भगव्याला नतमस्तक होऊन त्याचे पावित्र्य जपा. मानवजातीच्या विकासाचे व कल्याण करण्याचे सामर्थ्य केवळ हिंदू धर्मात असून हिंदूंनी यासाठी संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण विभागाचे प्रांत संघचालक अर्जुन उर्फ बाबा चांदेकर यांनी येथे केले.

हिंदू एकता मंचच्या वतीने बांदा बसस्थानकासमोरील महामार्गात हिंदवी स्वराज्य ध्वज स्तंभाचे लोकार्पण चांदेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी सावंतवाडी तालुका प्रचारक निखिल गावण, सिंधुसेवा सहयोगचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, स्वयंसेवक सतीश घोटगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मंगेश पाटील, रश्मी आठलेकर, हिंदू एकता मंचचे नीलेश सावंत-पटेकर, गुरु कल्याणकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर यांच्यासह हिंदू धर्म प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी धर्म ध्वजाचे चांदेकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. चांदेकर म्हणाले की, हिंदू देव देवता, संतापासून भगव्या ध्वजाचा इतिहास आहे. भगव्या ध्वजाच्या या परंपरेचे संवर्धन करून ती पुढील पिढीकडे हस्तांतरण करणे गरजेचे आहे. संपूर्ण जगाला हिंदू धर्माकडून अपेक्षा असून मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य केवळ हिंदू धर्मातच आहे.
यावेळी संघर्षविरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या धर्म ध्वजासाठी मदत व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब, माजी अध्यक्ष नीलेश मोरजकर, संदेश पावसकर, मंदार केसरकर, स्वागत नाटेकर, अक्षय बांदेकर, सनी बांदेकर, सौरभ आगलावे, जय सावंत, साईराज पावसकर, शुभम केसरकर, मिलिंद सावंत, शैलेश भिडे, केदार कणबर्गी, साहील आगलावे, दिपक गोवेकर, नितिन म्हावळणकर, सुरेश परब, साईप्रसाद कल्याणकर, स्वप्निल परब, सदाशिव मोर्ये, सुनिल सावंत, पृथ्वीराज बांदेकर, दर्पण आळवे, युवराज हरमलकर, बाबा काणेकर, शैलेश केसरकर, सत्विर शेखावत, दिलीप बांदेकर, विनेश गवस, सर्वेश नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रीना मोरजकर यांनी केले. आभार नीलेश सावंत यांनी मानले.
फोटो:-
बांदा येथे हिंदू धर्म ध्वजाचे लोकार्पण करताना मान्यवर व हिंदू धर्मप्रेमी नागरिक. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)

You cannot copy content of this page