मालवणात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रम…

मालवण ता.२१-:
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित जागर अहिल्यादेवींच्या प्रेरक जीवन चरित्रावर २५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात जीवन चरित्रावर पोवाडा, नाट्य, संगीत, नृत्य, माहितीपट आदी प्रयोगात्मक कलेतून सादरीकरण होणार आहे.

या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार, सिंधुदुर्ग पालकमंत्री नीतेश राणे, खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page