पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर तात्काळ काम मार्गी लावण्याचे दिले ठेकेदाराला आदेश..
⚡बांदा ता.२०-: बांदा-सटमटवाडी डिंगणे रस्त्याचे डांबरीकरण काम बंद ठेवण्यात आल्याने आज माजी उपसरपंच जावेद खतीब, बाळु सावंत यांनी आक्रमक होत ग्रामस्थानसह ठेकेदाराला जाब विचारला. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आल्याने त्यांनी ठेकेदाराला सक्त सुचना देत रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावण्याबाबत आदेश दिलेत.
बांदा सटमटवाडी डिंगणे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी रस्ता खोदाई करून २० दिवस उलटले. काम बंद असल्याने ग्रामस्थांना व शाळेतील मुलांना खूप त्रास होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी ठेकेदाराचे लक्ष वेधले, मात्र काम करण्यासाठी दिरंगाई होत होती. अखेर स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत श्री खतीब व श्री सावंत यांना कल्पना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत ठेकेदाराला कडक शब्दात जाब विचारला. तसेच त्याची तक्रार पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली. मंत्री राणे यांनी ठेकेदाराला काम तात्काळ करण्याबाबत आदेश दिलेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत श्री खतीब व श्री सावंत यांचे आभार व्यक्त केलेत.
यावेळी प्रदीप कळंगुटकार, संतोष वीर, महेंद्र मांजरेकर, सुरज मांजरेकर, प्रमोद कळंगुटकर, आनंद वसकर, देवानंद कळंगुटकर, विवेक केळूसकर, बाबली कळंगुटकर आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
