घर व पाणीपट्टी भरा,अन्यथा कारवाई होणार…

कणकवली : नगरपंचायत हद्दीतील बहुतांशी नागरिकांची घर व पाणीपट्टी थकीत आहे. थकबाकीरांनी येत्या ७ दिवसांत घर व पाणीपट्टी भरावी, असे आवाहन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कणकवली शहरातील बहुतांशी नागरिकांची घर व पाणी पट्टी थकीत आहे. थकबाकीरांनी येत्या ७ दिवसांत थकीत घर व पाणीपट्टी भरावे, अन्यथा त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात येईल. याशिवाय जप्तीची कारवाई न.पं. प्रशासनाकडून केली जाईल. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता धारकांची नावे वर्तमान पत्रात व शहराच्या मुख्य चौकात बॅनरवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे घर व पाणीपट्टी थकीत असलेल्या नागरिकांनी त्वरित थकबाकी भरावी. थकबाकी भरण्यासाठी आता शनिवार व रविवारी नगरपंचायतीचे कार्यालय सुरू राहणार आहे.

You cannot copy content of this page