महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा २०२५-२६ सालचा कार्यक्रम जाहिर

राज्यातील खेळाडूंसाठी यंदा १७ पेक्षाही जास्त स्पर्धा..

⚡कुडाळ ता.१२-: महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने सन २०२५-२६ सालचा भरगच्च कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून या वर्षी जवळपास १७ पेक्षाही जास्त राज्य स्तरीय स्पर्धा महाराष्ट्रातील खेळाडूंना खेळायला मिळणार आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये सुरको किंग कॅरम बोर्ड व सिस्का लिजेंड सोंगट्यांचा वापर करण्यात येणार असून विजेत्या खेळाडूंना जवळपास २० लाखांची रोख पारितोषिके मिळणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, जळगाव, पालघर आणि रायगड जिल्ह्यात या स्पर्धा / उपक्रम राबवले जाणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सन २०२५-२६ सालचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
१) एप्रिल २०२५ – बावडा, कोल्हापूर येथे शंभूराजे फ्रेंड्स सर्कल, कोल्हापूर आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
२) एप्रिल २०२५ – बोरिवली, मुंबई येथे १० वी एम. सी. एफ. राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
३) मे २०२५ – रत्नागिरी येथे आमदार चषक राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
४) मे २०२५ – मुंबई येथे अंपायर चर्चा सत्र.
५) जून २०२५ – न्यू बॉंबे स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी, जिल्हा – ठाणे येथे राज्य मानांकन स्पर्धा.
६) जून २०२५ – नरसोबावाडी, जिल्हा – कोल्हापूर येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
७) जुलै २०२५ – चेंबूर, मुंबई येथे ४ थी चेंबूर जिमखाना आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
८) जुलै २०२५ – जळगाव येथे राज्य मानांकन कॅरम सपर्धा.
९) ऑगस्ट २०२५ – सनीज वर्ल्ड, पुणे ३ री विनायक निम्हण स्मृती राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
१०) सप्टेंबर २०२५ – कणकवली, सिंधुदुर्ग येथे २ री पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
११) सप्टेंबर २०२५ – वांद्रे, मुंबई येथे ३ री एम. आय. जी. क्रिकेट क्लब आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
१२) ऑक्टोबर २०२५ – पाचगणी – महाबळेश्वर, सातारा येथे ५९ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा.
१३) नोव्हेंबर २०२५ – मुंबई येथे ३ री एम. आय. जी. क्रिकेट क्लब आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
१४) नोव्हेंबर २०२५ – जळगाव येथे ५९ वी जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा.
१५) नोव्हेंबर २०२५ – नाशिक येथे ५९ वी सब जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा.
१६) डिसेंबर २०२५ – मुंबई येथे सब जुनियर व जुनियर मुला मुलींसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
१७) डिसेंबर २०२५ – पालघर / रायगड येथे कार्यकर्ता चर्चा सत्र.
१८) जानेवारी २०२६ – घाटकोपर, मुंबई येथे ३ री जॉली जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
१९) फेब्रुवारी २०२६ – शिवाजी पार्क, मुंबई येथे १७ वी शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
२०) मार्च २०२६ – विलेपार्ले, मुंबई येथे ६ वी रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर, मुंबई राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.

You cannot copy content of this page