⚡मालवण ता.०५-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक गुरुवार दि. ६ रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण शहरातील लीलांजली हॉल येथे होणार आहे. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख संग्राम प्रभुगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तरी या बैठकीस मालवण तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना, युवतीसेना पदाधिकारी, शिवसेना सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
