संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…

डॉ सी.व्ही.रामन यांच्या संशोधन कार्याला उजाळा:दोन दिवस विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन..

⚡कुडाळ ता.०५-: येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि सायन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून अभिनव असा ऑल केम – २५ कार्यक्रम नुकताच झाला. राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त दोन दिवस विविध कार्यक्रम,स्पर्धा घेण्यात आल्या. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय होता.
समुद्राच्या निळ्या पाण्याच्या रंगाचे गमक हुडकून काढणारे तसेच भौतिक शास्त्रामध्ये बहुमोल संशोधन करणारे नोबेल पारितोषिकाचे मानकरी डॉ. सी.व्ही.रामन यांच्या कार्याचा प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये आढावा घेतला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय विज्ञान दिन २८फेब्रुवारी याच दिवशी साजरा करण्याचे प्रयोजन सांगत प्रमुख वक्ते प्रा.डॉ.सुहास पाटील यांनी सर रामन यांच्या वैज्ञानिक अभिरूचीवर प्रकाश टाकत रामन यांचे समाजपयोगी संशोधन उपस्थितांना उलगडून सांगितले.याप्रसंगी गणित विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.के.पवार यांनी विज्ञान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.तर प्रा.डॉ.ए.एन.लोखंडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल मार्गदर्शन केले.उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.पी.आर.रॉड्रिक्स यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त दोन दिवस विविध कार्यक्रम,स्पर्धा घेण्यात आल्या. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय होता. पहिल्या दिवशी केमिस्ट्री फन एक्सपिरिमेंटचे खास आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कला,वाणिज्य,विज्ञान,व्यवस्थापनशास्त्र अशा महाविद्यालयाच्या सर्वच शाखेच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए. एम. कानशिडे यांनी केले तर प्रा.डॉ. पी. डी. जमदाडे यांनी आभार मानले. प्रा.डॉ. एम. एन. जांबळे,प्रा.डॉ. आर वाय ठाकूर, प्रा.डॉ. के. एम. चव्हाण, प्रा.संतोष वालावलकर, प्राध्यापकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून रसायनशास्त्र विभाग आणि सायन्स असोसिएशन यांनी संयुक्त विद्यमाने सेमिनार कॉम्पिटिशन, प्रश्नमंजुषा आणि विज्ञानावर आधारित खेळ आदींचे आयोजन करण्यात आले. विविध स्पर्धांसाठी प्रा.डॉ. एम. एन. जांबळे, प्रा.डॉ. आर वाय ठाकूर, प्रा.ए.एम.कानशिडे, प्रा. संतोष वालावलकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सुरवसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यक एस. एच. रेडकर, प्रयोगशाळा कर्मचारी श्री. श्याम दाभोलकर, विद्यार्थी प्रतिनिधी प्रथमेश दळवी, शुभम राय तसेच विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे बहुमोल असं सहकार्य लाभले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुरवसे तसेच क.म.शि.प्र.मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page