बांद्या येथे आयोजीत मोफत रक्त तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…!

⚡बांदा ता.०४-: बांदा येथे आस्था क्लिनिकल लॅब यांच्या वतीने मातृत्व मेडिकल स्टोअर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत रक्त तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. उद्या बुधवारी देखील रक्त तपासणी शिबीर होणार आहे. पहिल्या दिवशी १०६ जणांची तपासणी करण्यात आली.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ गोवा, हिंदू एकता मंच बांदा व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने ९ मार्च रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी आवश्यक असलेली सर्व रोगावरील रक्ताची तपासणी आजपासून सुरु करण्यात आली. याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मराठा समाज अध्यक्ष विराज परब, नीलेश मोरजकर, गुरु कल्याणकर, हेमंत दाभोलकर, समीर परब, नीलेश सावंत, आस्था लॅबचे अमेय गवस आदी उपस्थित होते. उद्या बुधवारी देखील सकाळी ९. ३० ते दुपारी २ या वेळेत रक्त तपासणी होणार आहे.

You cannot copy content of this page