⚡मालवण ता.०४-:
चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव म्हणजेच अश्वमेध स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघातून खेळणारी मालवणची सुकन्या लीना धुरी हिने ऍथलेटिक्समध्ये आपल्या नेत्रदीपक कामगिरीने पदकांची लयलूट केली.
या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या संघातून खेळताना लीना धुरी हिने १००×४ रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तर ४००×४ रिले प्रकारात रजत पदक तसेच वैयक्तिक महिलांच्या ४०० मीटर धावणे प्रकारात कांस्यपदक मिळविले. लीना धुरी हि मालवण वायरी येथील मातोश्री राखीताई पाटकर स्पोर्ट्स अकॅडमीची प्रशिक्षणार्थी असून अकॅडमीचे प्रशिक्षक ताराचंद पाटकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. लीना हिच्या या यशाबद्दल तीचे मालवणमधून कौतुक होत आहे.
