नऊ देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीसाठी येणार:कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांची पत्रकार परिषदेत माहिती..
⚡देवगड ता.२१-: श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा दि. २६ फेब्रुवारी २०२५ ते २७ फेब्रुवारी
२०२५ रोजी मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. श्री देव कुणकेश्वरची पहिली पूजा मध्यरात्री एक वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्या हस्ते देखील पूजा होणार आहे. मध्यरात्री अडीच वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी दर्शनरांगा सुरू होतील. यावर्षीचा महाशिवरात्रीच्या यात्रा उत्सव एकच दिवसाचा असून एकूण नऊ देवस्वाऱ्या श्री देव कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहेत. देवस्वारी सोबत येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार नाही. त्यामुळे सायंकाळी पाच नंतर दर्शन रांगेमध्ये उभे राहणाऱ्या भाविकांना साधारणता पाच ते सहा तास दर्शनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे याची भाविकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे अशी माहिती श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश वाळके, उदय पेडणेकर, शैलेश बोंडाळे, महेश जोईल, संजय वाळके दीपक घाडी, आदि उपस्थित होते. तेली पुढे म्हणाले, सदर यात्रा नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. त्यामध्ये भव्यमंडप व्यवस्था, अखंडित विद्युत व्यवस्था,आपत्कालिन परिस्थितीमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरीकेटिंग व मजबूत रेलिंग करण्यात आले आहे. याकामी स्वतंत्र स्वयंसेवकांचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले आहे. एक दिवसाचा यात्रोत्सव असल्याने व नऊ दिवसाला येणार असल्याने
यात्रेच्या वेळी गर्दीचा फायदा घेवून चोऱ्या करणे, महिलांची छेडछाड
करणे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी देवस्थान ट्रस्टकडून मंदिर
व मंदिर परीसर, यात्रा परिसरात आवश्यक त्याठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यात जम्बो कॅमेऱ्याचाही समावेश आहे तसेच
देखरेखीसाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक आणि समुद्र किनारी सागरी सुरक्षादल असणार आहे. त्याचप्रमाणे देवगड महाविद्यालयाच्या वतीने प्रशासकीय यंत्रणांना तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागास मदतीस १०० विद्यार्थी स्वयंसेवक असणार आहेत. सदर विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव, प्रथमोपचार, बिनतारी संदेश यंत्रणा, पाण्यातील व्यक्ती बचाव पध्दती अशा अनेक बचाव पध्दतीने प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांव्दारे देण्यात आलेले आहे.विद्युत व्यवस्थापनाच्या दृष्टीने संबंधीत खात्याने आवश्यक ते
कामकाज यात्रेपूर्वी करण्याचे दृष्टीने कार्यवाही पुर्ण केली आहे.
श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे गर्दिच्या प्रमाणात
दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. यावर्षी महाशिवरात्री यात्रेदिवशी
कुंभमेळ्याची सांगता होणार असल्याने भाविकांचा ओघ वाढण्याची शक्यता
आहे. तसेच दर्श अमावस्या दिनांक २७ फेब्रुवारी रोजी असल्याने
तिर्थस्नानास भाविकांना व देवभेटी करीता येणाऱ्या देवस्वाऱ्यांना संपुर्ण दिवस लाभ घेता येणार आहे. समुद्र किनाऱ्यावरील भागामध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरूष व महिलांकरीता ठिकठिकाणी कपडे बदलण्यासाठीची व्यवस्था असणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा व कुणकेश्वर ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद्रकिनारी सुरक्षा पथके असणार आहेत.यात्रा परीसरामध्ये राजकिय बॅनर्स व इतर बॅनर्स यांपासून असुरक्षितता निर्माण होवू नये यासाठीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचेकडून करण्यात आले आहे. रस्त्यांवरती बॅनर्सच्या कमानी बांधण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुजाताट विक्रेते व व्यापारी यांना प्लास्टीक पिशव्या विक्री व वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
तसेच मा.पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणा व देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचेत यात्रा नियोजन बैठक पार पडली. त्यात प्रत्यक्षातकामकाजाची पाहणी करुन, उणिवा समजुन घेण्यात आल्या त्याच प्रमाणे संबधित शासकीय खात्याना अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुचना देण्यात आल्या त्यात प्रामुख्याने १. वहातुक व्यवस्था, २. रस्ते, ३.विद्युत व्यवस्था ४. आरोग्य व्यवस्था ५. पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था,पार्कींग व्यवस्था ६. स्वयंसेवक ७. पाणीपुरवठा ८. पार्कंग व्यवस्था यासर्व मुद्यांवर आढावा घेण्यात आला.
श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच
संपुर्ण महाराष्ट्र व देशभरात होणार आहे. तसेच संपुर्ण यात्रा परीसरामध्ये एल्.ई. डी. स्क्रीन व्दारे प्रक्षेपण आहे.
दिवसेंदिवस भाविक भक्तांचा वाढता ओघ पहाता देवस्थान ट्रस्टने
नियोजनात बदल करत सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्ट मार्फत उत्तम दर्जाचे चविष्ट गुळ बुंदी लाडु प्रसाद
म्हणुन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
यावर्षी श्री कुणकेश्वर भेटीकरीता व तिर्थस्नानासाठी येणार असणाऱ्या देवस्वाऱ्यांच्या कमिटीनी नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टशी लवकरात लवकर प्रत्यक्ष संपर्क साधावा असे ट्रस्ट तर्फे आवाहन केले जात आहे. यावर्षी श्री देव कुणकेश्वर भेटी करीता एकंदर नऊ देवस्वाऱ्यांची नोंद झाली असून यात्रेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ६ पासुन येणाऱ्या देवस्वारींचे आगमन ६ वाजलेपासुन होणार असल्याने गर्दीचे प्रमाण वाढणार आहे.
त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी
भाविकांनी यात्रा प्रारंभ काळापासुन
दिवसभरामध्ये जास्तीत जास्त दर्शन व्यवस्थेचा लाभ घ्यावा. तसेच सायं. ६
वा. ते रात्रौ १२ वा. पर्यंत भाविक भक्तांनी सहकार्य करावे जेणेकरुन
सुव्यवस्था राखण्यास देवस्थान ट्रस्ट व संबंधीत सर्व शासकीय प्रशासकीय
यंत्रणेस सुलभ होईल अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश वाळके, खजिनदार उदय पेडणेकर,शैलेश बोंडाळे, महेश जोईल, संजय वाळके आदि उपस्थित होते.
