केदार झाड यांच्या माध्यमातून ५०० विद्यार्थ्यांनी पाहिला ‘छावा’ चित्रपट…

⚡मालवण ता.२०-:
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता आणि जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांना समजावा या हेतूने मालवण मधील उद्योजक केदार मिलिंद झाड यांच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा हा ऐतिहासिक चित्रपट शालेय विद्यार्थ्यांसाठी देवबाग येथील मत्स्यगंधा समर्थ थिएटर येथे मोफत दाखविला. यामध्ये मालवण व आजूबाजूच्या परिसरातील विविध शाळांच्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहिला.

शिवजयंतीदिनी देवबाग येथील मत्स्यगंधा समर्थ थिएटरमध्ये छावा चित्रपटाचे सकाळी ८.३०वा. आणि सकाळी ११ वा. असे दोन शो केदार झाड यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत ठेवण्यात आले. यामध्ये मालवण मधील भंडारी, हायस्कुल, टोपीवाला हायस्कुल, रेकोबा हायस्कुल, रोझरी स्कुल यासह वायऱी, तारकर्ली, देवबाग, देवली काळेथर, कांदळगाव, महान येथील शाळांच्या अशा सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी छावा चित्रपट पाहिला. यामध्ये काही ठराविक पालकही सहभागी झाले होते. छावा चित्रपट मोफत दाखविण्याची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थी व पालक यांनी केदार झाड यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page