पर्यटक मारहाण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा…

सकल हिंदू समाजाचे पोलिसांना निवेदन:कडक कारवाईचे पोलिसांची ग्वाही..

कुडाळ : गुरुवारी सकाळी झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना झालेल्या मारहाणीबाबत आज सकल हिंदू समाजच्या वतीने कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ते चहाचे स्टॉल अनधिकृत असतील तर बंद करावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आज सायंकाळी कुडाळ पोलीस ठाण्यात जमा झाले होते. त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या चर्चा केली. श्री. मगदूम म्हणले कि, आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे त्या गुन्हेगारांवर त्या पर्यटकांनी नाही तर आम्ही पोलिसांनी तक्रार देऊन गुन्हा दाखल केलेला आहे. झालेला प्रकार खूपच अमानुष होता. त्यातील जे दोषी आहेत त्यापैकी तिघांना अटक झाली आहे. दोन महिलांना नोटीस दिल्या आहेत तर एक जो अल्पवयीन आहे त्याला उद्या बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे मगदूम यांनी सांगितलं. त्यावर हिंदू सकल समाजाच्या वतीने रमा नाईक यांनी किरकोळ कारणावरून पर्यटकांना मारहाण होत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही असा इशारा दिला.
यावेळी रमा नाईक यांच्या सह शेखर नाडकर्णी, विवेक पंडित, धीरज परब, समीर सराफदार, शिवप्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष मंगेश पाटील, दिनेश सावंत, हेमंत जाधव, सुधीर राऊळ, प्रसन्न गंगावणे, बाळा पावसकर, रत्नाकर जोशी, चंदन कांबळी, शुभम देसाई, अरविंद करलकर, अमित सरनोबत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page