कोकिसरे ओझरवाडी येथीलगॅरेजला भीषण आग…

दहा लाख वीस हजार रुपयांचे नुकसान:शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज..

⚡वैभववाडी ता.०६-:
कोकिसरे ओझरवाडी येथील असिफ बाबासाहेब आरवाडे वय 45 यांचे गॅरेजला भीषण आग लागून सुमारे दहा लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.  ही घटना गुरुवारी पहाटे घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
    
श्री.आरवडे यांचे गेली अनेक वर्ष कोकिसरे येथे गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये टू व्हीलर, फोर व्हीलर, मोटार पंप, व सर्व शेती अवजारे  याची दुरुस्ती केली जाते. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री गॅरेज बंद करून आपल्या घरी गेले होते. सकाळी पावणे सातच्या सुमारास त्यांना गॅरेजला आग लागल्याची माहिती फोनवरून मिळाली. त्यांनी तातडीने गॅरेज कडे धाव घेतली. आगीची माहिती मिळताच वैभववाडी नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्पूर्वीच आगीत गॅरेज जळून भस्मसात झाले होते. गॅरेजमध्ये ग्रास कटर,पंप,बॅटऱ्या तसेच वाहनांचे स्पेअर पार्ट,इंजिन ऑइल यासारखे सुमारे दहा लाख वीस हजार रुपयांचे साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. पोलीस कॉन्स्टेबल सोनल गोसावी, हरिश्चंद्र जायभाय यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

You cannot copy content of this page