बांदा पोलीस ठाणे व गड किल्ल्याच्या परिसरात करण्यात आली स्वच्छता मोहीम…

⚡बांदा ता.०५-: पानवळ येथील गोगटे-वाळके महाविद्यालयच्या एनएसएसच्या २० स्वयंसेवकांनी प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलीस ठाणे व गड किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.

आज सकाळी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत बांदा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रम अधिकारी रश्मी काजरेकर, सुधीर न्हावेलकर उपस्थित होते. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी स्वच्छता मोहिमेबद्दल सर्व मुलांचे आभार व्यक्त केले.
. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुनील पडवळ, पोलीस कर्मचारी सिद्धार्थ माळकर, शेखर मुणगेकर, श्री पालकर, माया पवार आदिसह कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page