आमदार कालिदास कोळंबकर यांचा १८ रोजी भंडारी समाजातर्फे होणार सत्कार…

⚡मालवण ता.०४-:
मुंबई सारख्या महानगरात नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल मालवणचे सुपुत्र, भंडारी समाजाचे आमदार कालीदास कोळंबकर यांचा सकल भंडारी हितवर्धव संस्था व भंडारी समाजाच्या वतीने दि. १८ फेब्रुवारी रोजी मालवण येथील लिलांजली हॉल मध्ये सत्कार करण्यात येणार आहे.

भंडारी समाजाच्या बैठकीमध्ये भंडारी समाजाचे आमदार कालीदास कोळंबकर यांचा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर, सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवणचे अध्यक्ष रविंद्र तळाशीलकर, उपाध्यक्ष सुनिल नाईक, सचिव पंकज पेडणेकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी नगरसेवक यतिन खोत, राजू आंबेरकर, भाऊ साळगाकर, देवदत्त हडकर, अजित गवंडे, सचिन गवंडे, बाळा सोनसुरकर, प्रविण मांजरेकर, चंद्रशेखर वाईरकर, सागर हडकर, सचिन आरोलकर व इतर भंडारी समाजाचे ज्ञाती बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page