ओझर येथे माळरानावर आग; आंबा कलमांचे नुकसान…

⚡मालवण ता.३०-:
मालवण ओझर येथील माळरानावरील गवताला आज दुपारी आग लागून हि आग पसरत जाऊन लगतच्या आंबा कलमांचे आगीमुळे नुकसान झाले. यावेळी मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या साहाय्याने पाण्याचा मारा करत हि आग विझवून आटोक्यात आणण्यात आली.

ओझर येथे मालवण- आचरा मुख्यरस्त्यालगत असलेल्या माळरानावरील गवताला आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. सुके गवत व वारा यामुळे हि आग पसरत गेली. हि आग लगतच्या आंबा कलम बागेपर्यंत पोहचून काही कलमांचे आगीमुळे नुकसान झाले. यावेळी ग्रामस्थानी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले तसेच मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले. काही वेळातच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचा मारा करण्यात आला. अग्निशमन बंबाने घटनास्थळी दोन वेळा फेऱ्या मारत पाण्याचा मारा केल्यानंतर हि आग आटोक्यात आली.

You cannot copy content of this page