एक जखमी: पोलीस घटनास्थळी दाखल;अधिक तपास सुरू..
⚡आंबोली,ता.१४-: येथील हिरण्यकेशी पूल येथे स्यांट्रो कार आणि होंडा सिटी चार चाकी गाड्यात अपघात झाला. कामतवाडी येथील बाळकृष्ण शंकर गावडे हे जखमी झाले.त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली. अपघात झाल्यानंतर लवू साबा गावडे यांनी तेथून जात असताना बाळकृष्ण गावडे यांना आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई,मनीष शिंदे,दीपक शिंदे यांनी आरोग्य केंद्रात जाऊन माहिती घेतली तक्रार घेण्याचे काम सुरु आहे.
