कै. डॉ. बी. बी. गायतोंडे यांची जयंती साजरी…

⚡बांदा ता.०३-: बांदा गावचे सुपुत्र जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार (कै.) डॉ. बी. बी. गायतोंडे यांची जयंती येथील नट वाचनालयात साजरी करण्यात आली.
यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी दीपप्रज्वलन करून डॉ. गायतोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, विद्यार्थीप्रिय शिक्षक कृष्णाजी वराडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वाचनालयचे सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, जगन्नाथ सातोसकर, सुधीर साटेलकर, अंकुश माजगावकर, यशवंत गवस, अनंत भाटे, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू आदिसह वाचक, सभासद व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री भाटे व श्री सावंत व श्री पाणदरे यांनी डॉ. गायतोंडे यांच्या अनेक आठवणीना उजाळा दिला. तसेच त्यांचे आरोग्य क्षेत्रातील जागतिक स्तरावरील योगदान व बांदा गावातील शैक्षणिक चळवळ याबाबत सविस्तर माहिती दिली.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात डॉ. गायतोंडे यांना अभिवादन करताना मान्यवर.

You cannot copy content of this page