सिंधुदुर्गनगरी ता २४
अमित शहा माफी मांगो… अमित शहा यांचा निषेध असो… आदी गगनभेदी घोषणा देत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या अपमानाचा निषेधार्थ आणि परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.तसेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, संविधान अमृत महोत्सवी वर्षा निमित्त १७ डिसेंबर २०२४ रोजी संसदेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीव पूर्वक डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेची थट्टा उडवत आज आंबेडकर, आंबेडकर ,आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणण्याची फॅशन झाली आहे. एवढं आंबेडकर यांचं नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर, सात जन्म स्वर्ग प्राप्त झाला असता असे वक्तव्य कले. या विधानामुळे भारतातील आंबेडकर वादी नागरिकांच्या.भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या अपमानाचा निषेधार्थ आणि परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष पी के चौकेकर, जिल्हा प्रभारी सुधाकर मानगावकर, आनंदकुमार धामापुरकर, नरेंद्र पेंडूरकर, विजय चौकेकर, स्वप्नील चौकेकर आदी उपस्थित होते.
गगनभेदी घोषणा दिल्या..
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने धरणे आंदोलन छेडताना डॉ. आंबेडकरांचा विजय असो… अमित शहा माफी मांगो… अमित शहा यांचा निषेध असो… आदी घोषणा देऊन येथील परिसर दणाणून सोडला.
फोटो ओळ -: बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले
