⚡मालवण ता.२३-: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती मालवण यांच्यावतीने आयोजित मालवण प्रभागस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवमध्ये कबड्डी क्रीडा प्रकारात मुलगे गटात जि.प. प्राथमिक शाळा मालवण रेवतळे संघ विजेता ठरला.
मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी विजेत्या संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच पुढील स्पर्धासाठी आवश्यक असणारी टीशर्ट भेट दिली आहेत. यावेळी शिक्षक महादेव घोडके, शिक्षिका वर्षा परब यांसह महेश सारंग, महेश दाभोलकर, ललित चव्हाण, पंकज पेडणेकर, कॅलिस फर्नांडिस, प्रदीप मांजरेकर, राजा मांजरेकर, जयंत मसुरकर, बाबू वायंगणकर, शुभम लुडबे, निनाद बादेकर उपस्थित होते.
