वायरी बांध येथे १३ पासून दत्त जन्मोत्सव…

⚡कणकवली ता.१०-: श्री सद्गगुरू सदानंद माउली महाराज सांप्रदायाच्या श्रीक्षेत्र दत्त मंदिर, वायरी बांध, मालवण येथे १३ व १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता अखंड नामस्मरण आरंभ. १४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता अखंड नामस्मरण समारोह व दहीहंडी, सकाळी ७:३० वाजता होमहवन आणि श्रींच्या निर्गुण पादुकांवर लघु रुद्राभिषेक, दुपारी १२ वाजता माधुकरी (भिक्षा मागणे) सायंकाळी ४ वाजता ह. भ. प. अण्णा देसाई, वालावल यांचे सुश्राव्य कीर्तन, सायंकाळी ६ वाजता श्रीदत्त जन्मोत्सव, रात्री ८ वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संप्रदायाचे कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page