मालवण तालुकास्तरीय कथाकथन व गीतगायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

बॅ. नाथ पै संचालित साने गुरुजी वाचन मंदिरतर्फे आयोजन..

⚡मालवण ता.०९-: बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने मालवण तालुकास्तरीय कथाकथन व गीतगायन स्पर्धा सेवांगणच्या दादा शिखरे सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेला तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत १८३ स्पर्धक सहभागी झाले होते.

प्रारंभी साने गुरुजी आणि बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेला सेवांगणचे कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, सेवांगणचे व्यवस्थापक संजय आचरेकर, सुनिता देवी अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ.आनंदी घोगळे, सायली गोसावी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उदघाट्न झाले. साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक शैलेश खांडाळेकर यांनी केले. संजय आचरेकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
विभाग पहिला – बालवाडी – कथाकथन – प्रथम- नांदी राजेश परब (काळे आजींची शिशुविहार बालवाडी), व्दितीय – श्रीनिका निखिल नागवेकर (सिताबाई श्रीपाद घुर्ये प्रायमरी स्कूल), तृतीय – रूपेश गोविंद सातोसकर(देवबाग राऊळवाडी शाळा) उत्तेजनार्थ प्रथम -ह्रदयांश अनिकेत फाटक(सिताबाई श्रीपाद घुर्ये प्रायमरी स्कूल), उत्तेजनार्थ द्वितीय – किमया संदिप सावंत (कुणकवळे शाळा), गीतगायन- प्रथम-वृंदा दिवाकर पंत वालावलकर(काळे आजींची शिशुविहार बालवाडी), द्वितीय – अलिना वसीम बांगी (प्रा.कन्याशाळा), तृतीय -भूमी आनंद पाटकर(धुरीवाडा शाळा), उत्तेजनार्थ प्रथम -हर्षदा जगदिश वालावलकर (भंडारी हायस्कूल बालवाडी), उत्तेजनार्थ द्वितीय- ॲलेक्स फ्रॅंकी फर्नांडिस (आडवण वायरी क्र.९९बालवाडी).

विभाग दुसरा – इ.१ ली २ री- कथाकथन – प्रथम- तनय चंद्रशेखर कुशे (रोझरी इंग्लिश स्कूल), द्वितीय -श्रावणी दयाळ पाटकर(रोझरी इंग्लिश स्कूल), तृतीय – श्लोक वि.सामंत (मोहनराव परूळेकर प्राथ.शाळा), उत्तेजनार्थ प्रथम -आर्य गणेश जाधव(प्राथ.शाळा कुणकवळे), उत्तेजनार्थ द्वितीय -त्रिशा रविंद्र मालवणकर(प्राथ.शाळा देऊळवाडा), गीत गायन- प्रथम-मंत्रा नितीन कोळंबकर(जय गणेश इंग्लिश स्कूल), द्वितीय -कावेरी गौरव बिले (देऊळवाडा शाळा), तृतीय -श्लोक वि.सामंत(मोहनराव परूळेकर प्रा.शाळा), उत्तेजनार्थ प्रथम -सरह प्रविण पवार(रोझरी इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ द्वितीय -त्रिशा रविंद्र मालवणकर देऊळवाडा शाळा).

विभाग तिसरा – इ.३री ४ थी- कथाकथन – प्रथम- मधुरा दिपक मिठबांवकर(मोहनराव परूळेकर प्रा.शाळा), द्वितीय -स्वरा स.चव्हाण(जि.प.देवली खालची शाळा), तृतीय -रेणुका गु. चव्हाण ( भंडारी प्राथमिक शाळा), उत्तेजनार्थ प्रथम-प्रशिक ग.इंगळे (रोझरी इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ द्वितीय -वरद यो.पारधी(मोहनराव परुळेकर प्रा.शाळा), गीतगायन – प्रथम -रिया प्रसाद केळूसकर (भंडारी प्राथमिक शाळा), द्वितीय – धम्मतेजा पल्लव कदम (आडवली नं १), तृतीय -प्रणेश दत्तात्रय वारीक (प्राथ.कन्याशाळा), उत्तेजनार्थ प्रथम -निहारीका पांडूरंग सारंग(दांडी शाळा), उत्तेजनार्थ द्वितीय -कृपा केदार साळगांवकर (भंडारी प्राथमिक शाळा).

विभाग चौथा -इ.५वी ७वी- कथाकथन- प्रथम -ओजस्वी कैलास साळुंके (अ.शि.दे.टोपीवाला हायस्कूल), द्वितीय -अस्मी अशोक आठलेकर (अ.शि.दे.टोपीवाला हायस्कूल) तृतीय -मनस्वी पल्लव कदम(आडवली नं.१), उत्तेजनार्थ प्रथम -स्वरा पवन बांदेकर (भंडारी हायस्कूल) उत्तेजनार्थ द्वितीय -निधी निनाद वारंवार(गोळवण शाळा), गीतगायन- प्रथम- मृण्मयी आरोलकर (टोपीवाला हायस्कूल), द्वितीय -गौरी राजन वस्त (अ.शि.दे.टोपीवाला हायस्कूल), तृतीय -शौर्य सुशांत करंगुटकर(रोझरी इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ प्रथम – श्रेया लक्ष्मण शिंदे (भंडारी हायस्कूल), उत्तेजनार्थ द्वितीय -वेदांत योगेश लाड (आडवली शाळा).

विभाग पाचवा इ.८वी १०वी- कथाकथन प्रथम -भाविका प्रसाद चव्हाण (न्यू इंग्लिश स्कूल आचरा), द्वितीय -रोशन कैलास साळुंके (टोपीवाला हायस्कूल), तृतीय -दिया दत्तात्रय गोलतकर (भंडारी हायस्कूल), उत्तेजनार्थ प्रथम -वंशिका मनोज रावले (रोझरी इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ द्वितीय – सई अंकुशराव घुटूकडे (न्यू इंग्लिश स्कूल आचरा), गीतगायन- प्रथम- स्वरा अनिरुद्ध आचरेकर (न्यू इंग्लिश स्कूल आचरा)
द्वितीय -भूमी आशिष नाबर(न्यू इंग्लिश स्कूल आचरा) तृतीय -सुशील दत्तात्रय प्रभूकेळूसकर (टोपीवाला हायस्कूल), उत्तेजनार्थ प्रथम -स्वरा अर्जुन पेंडूरकर (वराडकर हायस्कूल कट्टा), उत्तेजनार्थ द्वितीय -लौकिक श्रीगणेश मालवणकर(रोझरी इंग्लिश स्कूल).

या स्पर्धेचे परिक्षण ॲड. पलाश चव्हाण, अक्षय सातार्डेकर, ॲड. प्रथमेश सामंत, शिवराज सावंत, सौ.आनंदी घोगळे, सौ.गौरवी पराडकर, डॉ.गार्गी ओरसकर, मैत्रेयी बांदेकर, सौ.गौरी गवाणकर, मनाली वेंगुर्लेकर, संग्राम कासले, सौ.मिनाक्षी मेस्त्री, सायली गोसावी, ऋतू गोवेकर, वैभव मांजरेकर यांनी केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बॅ नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, संजय आचरेकर, श्रीपाद पंतवालावलकर, डॉ.गार्गी ओरसकर तसेच परीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. बालवाडी गटासाठी सहभागी सर्व स्पर्धकांना संजय आचरेकर यांच्या देणगीतून पारितोषिके देण्यात आली. तसेच विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सेवांगणच्या उपक्रमांची माहिती दिली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संजयकुमार रोगे, सौ.सोनाली कांबळी, सेवांगणचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी केले.

You cannot copy content of this page