⚡मालवण ता.०८-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पासून ७ किलोमीटर अंतर चढावर असणाऱ्या टिकलेश्वर मंदिरापर्यंत ट्रेकिंग कॅम्प करण्यात आला. या कॅम्पमध्ये एनसीसीचे ४३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रेकिंग कॅम्प आयोजित करण्यात आला. एनसीसी विभागाचे सीनियर मनाली पालव, संतोष तांबे, राहुल जाधव,, प्राजक्ता नाईक, सिद्धी मराठे , दर्पणा जाधव, गौरी रेवणकर, प्रणव देवलकर, वैभव पाताडे, मिथुन मानवर विवेक पाटील, सुनील कुमार सैनी या सर्व सीनियरने या कॅम्पच्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. या कॅम्पमध्ये एनसीसीच्या ४३ विद्यार्थ्यांसह माजी एनसीसी सीनियर विनायक मानवर आणि अभिषेक एस. एस. सहभागी झाले होते.
या कॅम्पसाठी प्राचार्य शिवराम ठाकूर, कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सीडीसी अध्यक्ष ऍड. समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुशे, संस्थेच्या संचालक मंडळातील साईनाथ चव्हाण, संदेश कोयंडे, प्रमोद ओरसकर, डॉ. शशिकांत झाटये, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, महादेव पाटकर व इतर पदाधिकारी यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ट्रेकिंग कॅम्प पूर्ण केल्याबद्दल ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना खडतर प्रवासाची सवय व्हावी, विद्यार्थी शारीरिक दृष्टीने सक्षम व्हावेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवन जगण्याची सवय लागावी, भविष्यातील कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी किंवा सीमेवर जवान म्हणून भरती झाल्यानंतर युद्धासाठी सज्ज असण्यासाठी ट्रेकिंग कॅम्प अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी अशा प्रकारच्या साहसी कॅम्पचे आयोजन करण्यात येते, असे लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत यांनी सांगितले.
