डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आपल्यासाठी दीपस्तंभ…

प्रा. नितीन बांबर्डेकर:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत महापरिनिर्वाण निमित्त महामानवास अभिवादन..

⚡कुडाळ ता.०७-: भारताबरोबर जगाला ही स्वातंत्र्य,समता बंधुता व मानवतेची संदेश देणारे भारतरत्न विश्ववंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, त्यांची जीवनमूल्य यांचा सर्वांनी अंगीकार केल्यास मानवी जीवनातील बऱ्याच समस्या-संघर्ष दूर होऊ शकतील,. असे उद्गार बॅ. नाथ पै बी.एड महाविद्यालयाचे प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी प्रा .अरुण मर्गज, प्रा.परेश धावडे, प्रा. वैशाली ओटवणेकर प्रा .शांभवी आजगावकर- मार्गी, प्रा सुमन करंगळे -सावंत, प्रा.प्रणाली मयेकर, जर्मनी भाषा शिकविणारे टीचर. बॅरिस्टर नाथ पै ॲकॅडमीचे प्रा . देवेंद्र सिंग, प्रा. रामजी पाठक, प्रा .चतुरसिंग, प्रा.भारतसिंग, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या प्रिया केडगाळे, सुचिता बाकरे-म्हाडदळकर, रोहिदास राणे, प्रज्ञा कुलकर्णी ,अंकिता वरदे,विविध अभ्यासक्रमाचे शिक्षक प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी सर्वसामान्यांना माहीत नसलेले बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही अप्रसिद्ध गोष्टी, घटना संवेदनशील प्रसंग, मानवतावादी कार्य, उपस्थितसमोर समोर कथन केले .व त्यांच्या विश्ववंदनीय स्मृतीस अभिवादन केले.
प्रा.अरुण मर्गज यांनी म्हटले कि, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातिभेदांच्या पलीकडे जाऊन वंचित समाजाला न्याय मिळवून देणारे महामानव होते. यांचे जीवन सर्वांसाठी आदर्शभूत आहे. भारतातील वर्णव्यवस्थेच्या पिंजऱ्यात अडकलेल्या समाजाला स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्यासाठी केलेले प्रयत्न आज सुद्धा आदर्शभूत असल्याचे प्रा. मर्गज यांनी सांगितले. . त्यांच्या विचारांची शिकवण, त्यांच्या जीवन तत्त्वांचा स्वीकार केल्यास मानवी समाज खऱ्या अर्थाने संधीची समानता प्राप्त करून बंधन मुक्त होईल. असे सांगून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.

You cannot copy content of this page