फोंडाघाटात टँकर पलटी होऊन पेटला…

सायंकाळची घटना:दोन तासापासून वाहतूक ठप्प..

कणकवली : कोल्‍हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज फोंडाघाटात पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्‍याने टँकर पलटी झाला. त्‍यानंतर टँकरने लगेच पेट घेतला. त्‍यामुळे सायंकाळी साडे सहा पासून फोंडाघाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. अग्निशमन बंब मागवून आग आटोक्‍यात आणल्‍यानंतर घाटातील वाहतूक सुरू होण्याची शक्‍यता आहे. अपघातस्थळी कणकवली पोलीस रवाना झाले आहेत

You cannot copy content of this page