शेर्लेच्या माऊली मंदिरात दिवजोत्सव महिला भाविकांच्या उपस्थितीत संपन्न…

बांदा/प्रतिनिधी
शेर्ले येथील श्री देवी माऊली मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही देव दिवाळीनिमित्त ‘दिवजोत्सव’ हा कार्यक्रम शेकडो महिला भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.
महिला भाविक डोक्यावर लामण दिवा घेऊन माऊली मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. सोबत वाजंत्री व मानकरी ग्रामस्थ व भावीक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. विशेषतः महिला वर्ग उपस्थित होते. दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसरात झगमगाट झाल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

You cannot copy content of this page