तिलारीचा 200 कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण झाल्याने वेंगुर्ला, रेडी, आरोंदा, शिरोडा भागातील पाण्याचा प्रश्न सुटणार…

मंत्री दिपक केसरकर: वेंगुरला भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्याचें काम पूर्ण…

⚡सावंतवाडी ता.१०-: तिलारीचा 200 कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण झाल्याने ते पाणी आता प्रामुख्याने वेंगुर्ला, रेडी, आरोंदा, शिरोडा यांना मिळणार असून, तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्याचें काम झाले असून, या रस्त्यांना दोन्ही बाजूने गटार नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. यासाठी केंद्रीय समितीकडे प्रस्ताव देणार असल्याची माहिती आज आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शिरोडा गावच्या सरपंच्यानी दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

You cannot copy content of this page