जनतेने फसविणार्‍या लोकांपासून सावध राहावे…

सुनील पेडणेकर:मला भरघोस मतं देऊन आपल्या सेवेची एकदा संधी द्या..

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये मागील निवडणुकीत माझे डिपॉझिट जप्त झाले. तरी देखील यावेळी मी माझी उमेदवारी कायम ठेवली आहे. कारण हा माझा लढा जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी आहे. काही लोकांनी सिंधुदुर्ग जिल्हा लुटून अक्षरशः अवैध मार्गाने खोर्‍याने पैसा कमावला आहे. त्याची उधळपट्टी आगामी विधानसभा निवडणुकीत नक्की होणार, मात्र जनतेने आता आपल्याला फसविणार्‍या लोकांपासून सावध राहावे, अशी रोखठोक टीका अपक्ष उमेदवार सुनील पेडणेकर यांनी केली आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पेडणेकर बोलत होते.

यावेळी अपक्ष उमेदवार सुनील पेडणेकर पुढे म्हणाले, माझी अपक्ष उमेदवारी कायम असून मला ‘फलंदाज’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तरी तमाम मतदार बांधवांनी आणि भगिनींनी मला भरघोस मतं देऊन आपल्या सेवेची एकदा संधी द्यावी, मी आपला विश्वास नक्कीच सार्थक ठरवेल, असे देखील आवाहन त्यांनी केले.

You cannot copy content of this page