महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच…

मासेवाहू कंटेनरचा अपघात: सुदेवाने चालक किरकोळ जखमी..

कुडाळ: प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असून आज पहाटे ६ च्या सुमारास कारवारच्या दिशेने जाणाऱ्या मासेवाहू कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. सदर कंटेनर रत्नागिरी ते कारवार असा जात असताना चालकाचा ताबा सुटून अपघात झाला असा प्राथमिक अंदाज आहे.

You cannot copy content of this page