महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा देवगड तालुक्यात प्रचाराचा झंझावात सुरू:देवगड तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर दिलाय भर..
देवगड (प्रतिनिधी)
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा कणकवली विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.सलग दोन दिवस देवगड तालुक्यातील कार्यकर्त्याच्या भेटीगाठी व गावभेट कार्यक्रमावर संदेश पारकर यांनी भर दिला आहे. प्रस्थापितांना घरी बसवून एक वेळ संधी द्यावी असे पारकर मतदाराला सांगून आवाहन करत आहेत. या प्रचारदौऱ्यात मी आमदार तर तुम्ही आमदार या टॅगलाईनची सर्वत्र चर्चा होत आहे.
देवगड तालुक्यातील तिर्लोट, गिरये,रामेश्वर,विजयदुर्ग,पडेल,पुरळ, आदी गावासह आज शिरगाव निमतवाडी येथील संजय राणे आणि जितू राणे यांच्या घरी संदेश पारकर यांनी सदिच्छा भेटी दिल्या.यावेळी निमतवाडी १००% संदेश पारकर यांनाच मतदान करणार असा निश्चय करण्यात आला आहे.मात्र या प्रचार दौऱ्यात मी आमदार तर तुम्ही आमदार या टॅगलाईनची गावागावात चर्चा होत आहे. घराणेशाहीला शिरगाव गावातून हद्दपार करण्यासाठी संदेश भाई सारखा आमदार पाहिजे अशा भावना येथील यावेळी ग्रामस्थांनी दाखवल्या. यावेळी त्यांच्यासोबत संतोष राणे, विनायक सतरकर, जितेंद्र सतरकर, जयेश राऊळ, जगदीश राऊळ, बाळकृष्ण चव्हाण,नाना सतरकर, साहिल राणे, जितू राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
देवगड तालुक्यातील चांदोशी गावात विनायक आचरेकर आणि विजय घाडी त्यांच्या घरी संदेश पारकर यांनी दिली. चांदोशी गावातील धुरीवाडी आणि घाडीवाडी येथून संदेश पारकर यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.गेल्या दहा वर्षात येथील स्थानिक आमदाराने आमच्या भागाचा कोणताच विकास केला नाही त्यामुळे येत्या विधानसभेला त्याला या प्रभागातून कोणतेही मतदान करणार नाही असा ठराव येथील ग्रामस्थांनी केला.त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येणारा संदेश भाई सारख्या उमेदवाराला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत असे येथील ग्रामस्थांनी संकल्प केला. यावेळी त्यांच्यासोबत विनायक शेठ आचरेकर, सलमान खान, प्रणय चांदोसकर, विश्वनाथ मेस्त्री, आरती धुरी, बाबू धुरी, सुरज गाडी, जॉली तेली आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
