मतदारसंघाचा विकास करणे हे माझ उद्दिष्ट…

विशाल परब:वेंगुर्ला येथील श्री देव रामेश्वर व श्री देवी सातेरी यांना श्रीफळ ठेवत प्रचाराचा केला शुभारंभ..

⚡वेंगुर्ला ता.०६-: माझ्यावर केलेल्या कारवाईबाबत बोलण्यापेक्षा विशाल परब याने भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत वाढविण्यासाठी किती कार्य केले हे मी जनतेला सांगेन. माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता जर विधानभवनात गेला तर प्रचंड बदल होऊ शकतात. रोजगाराच्या प्रचंड संधी येऊ शकतात. बेरोजगारी घालविणे, चांगल्या आरोग्य सुविधा मिळवून देणे आणि या मतदारसंघाचा विकास करणे हे माझे उद्दिष्ट असल्याचे विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी वेंगुर्ला येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज वेंगुर्ला येथील श्री देव रामेश्वर व श्री देवी सातेरी यांना श्रीफळ ठेवत प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत चंद्रशेखर शिरगांवकर, दादा नवार, सचिन शेटये, प्रशांत नाईक, रमेश नरसुले, मधुकर खाडे, सुनिल घाग उपस्थित होते. पुढे बोलताना श्री.परब म्हणाले की, एखादा तरूण जर पुढे जात असेल तर त्याला चांगला प्रतिसाद देणे ही काळाची गरज आहे. परंतु, आज विशाल परब सोबत संपूर्ण जनता आहे. भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यात आणि कोकणात संपविण्याची सुपारी अनेक जणांनी घेतली. मला याबाबत काहीही बोलायचे नाही आहे.

  प्रारंभी दोन्ही देवस्थानाच्यावतीने तेथील मानकरी, ट्रस्टचे विश्वस्त यांनी विशाल परब यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बहुसंख्य विशाल परब समर्थक उपस्थित होते.
You cannot copy content of this page