मालवण भरड येथील दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता…!

मालवण (प्रतिनिधी)

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत… ढोल ताशांचा गजरात श्री गणेश मूर्तीची भव्य विसर्जन मिरवणूक काढत मालवण भरड येथील श्री एकमुखी दत्त मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची काल सांगता झाली. यानिमित्त सादर करण्यात आलेला ‘फुलला मळा भक्तीचा’ पौराणिक चलचित्र देखावा सर्वांचे आकर्षण ठरला.

मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात गणेश चतुर्थीला श्री गणेश मूर्ती विराजमान झाल्यावर गेले ४२ दिवस हा गणेशोत्सव साजरा झाला. यनिमित्त मंदिरात विविध भजने, समई नृत्य, सुगम संगीत, कीर्तन, सत्यनारायण महापूजा आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले. तर काल भव्य पालखी मिरवणूकीने श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या या मिरवणुकीत श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या संकल्पनेतून ‘फुलला मळा भक्तीचा’ हा पौराणिक कथेवर आधारित चलचित्र देखावा सादर करण्यात आला. यामध्ये विठ्ठल – प्रवीण पराडकर, संत सावता माळी – रुपेश खोबरेकर, बायको – योगिता सावंत, मुलगी – हर्षाली गणेश पाडगांवकर, ब्राम्हण – संतोष मंडलिक यांनी अभिनय साकारला. या देखाव्याचे दिग्दर्शन- विलास देऊलकर यांनी केले. रंगभूषा आणि वेशभूषा – तारक कांबळी, प्रकाश योजना- सचिन आरोलकर, किरण करवडकर, सुयोग ढोलम, संतोष माणगांवकर, बबन मयेकर, पार्श्वसंगीत- गौरिश काजरेकर, सुधीर गोसावी, अभय कदम, विशेष सहाय्य- महेश धामापूरकर, सुमुख आर्ट्स, विवेक देऊलकर, संतोष मेस्त्री, पार्थ मेस्त्री, प्रमोद मेस्त्री, सुभाष मेस्त्री, पारस मेस्त्री युवराज चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page