१० मे पासून अंमलबजावणी:शहराला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी निर्णय;नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती
*💫सावंतवाडी दि.१५-:* शहरातील लोकांना पुराश्या प्रमाणात पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे चराठा आणि माजगाव या गावातील प्रत्येकी एका एका वाड्याला सावंतवाडी नगरपालिकेकडून देण्यात येणारे पाणी १० मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष याना पत्र लिहून तशी आपण माहिती देणार असून, त्या गावातील वाड्याना पाणी पुरवठा करण्याबाबत कळवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
