अधीक्षकांना दिले मागण्यांचे निवेदन
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७* जिल्ह्यातील डाक सेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ओरोस येथील डाक अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले त्यानंतर अधीक्षक यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संधटना सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष संतोष हरयान व सेक्रेटरी श्री जे. एम. मोडक यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारीही निदर्शने करण्यात आली. देशव्यापी संपात सहभागी होऊन जिल्ह्यातील डाक सेवकांनी.आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी जोरदार निदर्शने केली .डॉ. कमलेश चंद्र कमेठीच्या शिफारसी लागु करण्यासाठी एकजुटीने जिल्ह्यातील डाक सेवक संपात सहभागी झाले.व आपल्या एआय जीडीएस सिंधुदुर्गची ताकद दाखवून दिली