सावंतवाडी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला त्यामुळें काँग्रेसलाच उमेदवारी द्या…

महेंद्र सांगेलकर: काँग्रेसमुळे राजन तेली आमदार, त्यामुळे केलेलं वक्तव्य चुकीचं..

⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदासंघ काँग्रेसला मिळावा अशी आम्ही वरिष्ठांकडे मागणी केली असल्याची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे. काँग्रेस मधून विलास गावडे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केल्याची माहिती देखील त्यांनी दिली असून, यावेळी वरिष्ठांकडून योग्य तो विचार केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच महाविकास आघाडी जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल असे देखील स्पष्ट केले आहे. परंतु, महाविकास आघाडी कडून अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर झाली नसल्याने कोणीही उमेदवारी मिळाल्याचा दावा करू नये असे आवाहन केले आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, राजन तेली यांनी काँग्रेस बाबत केलेले वक्तव्य चुकीचे असून, काँग्रेसमुळेच ते आमदार व जिल्हा बँक अध्यक्ष झाले होते हे त्यांनी विसरू नये असा टोला देखील लगावला आहे.

You cannot copy content of this page