महेश सारंग ; कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात कार्यकर्त्यांची बैठक…
⚡सावंतवाडी ता.१५-:
कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाची बैठक नुकतीच महेश सारंग यांच्या निवासस्थानी पार पडली.
या बैठकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मिळावा असा एकमुखी ठराव देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान पक्षात कोणतीही मतभेद नसल्याचे देखील यावेळी महेश सारंग यांनी स्पष्ट केला आहे. आपण सर्वजण एक दिलाने काम करून येणाऱ्या निवडणुकीत आपल्या विजय मिळवायचे आहे, त्या दृष्टीने सर्वजण कामाला लागा, असे आवाहन यावेळी सारंग यांनी केले.
या बैठकीला भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, भाजपा आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, पक्ष निरीक्षक (गोवा) दया नाईक, भाजपा आंबोली मंडल महीला अध्यक्षा प्राजक्ता केळूसकर, आंबोली मंडल उपाध्यक्ष अशोक गावकर, कोलगाव सरपंच संतोष राऊळ , कारीवडे सरपंच आरती माळकर, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, कोलगाव सोसायटी चेअरमन विरेंद्र धुरी, कोलगाव माजी सरपंच बळवंत कुरतडकर, अनिल नाईक, शक्ती केंद्र प्रमुख योगेश गवळी, कारीवडे ग्रामपंचायत सदस्य महेश गावकर, साक्षी कुरतडकर, कुणकेरी माजी उपसरपंच कृष्णा मेस्ञी, बुथ अध्यक्ष रामचंद्र करमळकर, उमेश कुरतडकर, दिपक डांबरेकर, सिद्धेश बाकुळकर, रामचंद्र राऊळ, विश्राम दळवी, प्रविण म्हाडगुत, उमेश गावकर, बाळकृष्ण सावंत, संतोष राणे, कोलगाव सोसायटी संचालक जयानंद म्हापसेकर, सलमा बेगम शेख, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अब्दुल काझी उपस्थित होते.
