जनतेने दिलेल्या प्रेमामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो…

विशाल परब: नगरपरिषदेला वाढदिवसानिमित्त केले किटनाशक मशीन सुपूर्त, शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी…

सावंतवाडी ता.१५:- जनतेने दिलेल्या प्रेमामुळे मी आज इथपर्यंत पोचलो, त्यांचे ऋण मी कधीही फेडू शकत नाही, असे गौरद्वागार भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज येथे काढले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान देशभरात सुरू केला असल्याने त्या निमित्ताने आम्ही नगरपालिकेला शहरात होणाऱ्या मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही अत्याधुनिक मशनरी आज माझ्या वाढदिवसाने सुपूर्त करत असल्याचे देखील विशाल परब यावेळी स्पष्ट केले.

श्री.परब पुढे म्हणाले, रतन टाटा यांच्या दुःखद निधनाने यंदाचा वाढदिवस मी न साजरा करण्याचा घेतला निर्णय परंतु जनहिताचे असलेले कार्यक्रम मी आयुष्यभर करत राहणार असे विशाल परब यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलेले नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी माझ्यावर आयुष्यभर असेच प्रेम ठेवावं नक्कीच मी येणाऱ्या काळात सावंतवाडीला विकासाच्या प्रगतीवर नेईन, असा विश्वास आहे त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी, राजू बेग, मनोज नाईक, सुधीर आरीवडेकर,अँड.अनिल निवरेडकर मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर समृद्धी विरनोडकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, बंटी जामदार, ज्ञानेश्वर पाटकर सविता टोपले, विराग मडकेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page