सावंतवाडी वकील संघटनेच्या वतीने संग्राम देसाई यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी वकील संघटनेच्या वतीने बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. संग्राम देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक, उपाध्यक्ष अँड. नीलिमा गावडे, कोशाध्यक्ष अँड. अण्णा बांदेकर, ,तालुका संघटना अध्यक्ष अँड. नीता कविटकर, ज्येष्ठ वकील अँड. दिलीप नार्वेकर, अँड. सुभाष पंदुरकर, अँड. डी.के. गावकर, अँड. शाम सावंत, अँड. संदीप निबाळकर अँड. पी डी देसाई, अँड. संदेश राणे व सावंतवाडी संघटनेचे बहुसंख्य वकील उपस्थित होते. यावेळी अँड. परिमल नाईक. अँड. सुभाष पणदूरकर, अँड. दिलीप नार्वेकर, अँड. नीता कविटकर यांनी शुभेच्छापर मनोगत मांडले व सत्कार मूर्ती यांनी आपल्या पदाला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन व नवोदित वकील वर्गाला सर्वतोपरी मार्गदर्शन व प्रयत्न करेन असे सत्काराला उत्तर देताना विचार मांडले.

You cannot copy content of this page