बांदा ता.१४-:* भाजप युवा मोर्चाची बांदा मंडल कार्यकारणी जाहीर झाली असून, यात भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बांदा मंडल सिद्धेश सगुण कांबळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर क्लेटस फर्नांडिस , रुपेश पटेकर यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संदिप बांदेकर, मनीष केरकर, प्रितेश आरोंदेकर, विनायक परबयांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर बांदा शहर अध्यक्ष पदी साई सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर शुभम नाईक, अनंत परब, विजय सावंत, अक्षय मयेकर यांची चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच योगेश रेडकर यांची खजिनदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर वैभव मडुरकर, ज्ञानेश्वर मुळीक, उदय सातार्डेकर, राजेश देसाई, रामचंद्र पालव, प्रथमेश सावंत, रामचंद्र गावकर, संतोष पाटकर, प्रविण जाधव, विनय पालव, भगवान देसाई, भगवान शेट्ये, अभिजित देऊलकर यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
