उद्धव ठाकरे शिवसेनेकडून निवेदन सादर..
आंबोली,ता.१४ : येथील बसस्थानकात पावसाचे पाणी येऊन दुरावस्था होते.त्या ठिकाणी मोरी चे काम अडवण्यात आले होते.जनता दरबारात या संदर्भात अनिल चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.यावेळी पालक मंत्री यांनी वन अधिकाऱ्यांना सदर काम करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र अद्याप ही काम झालेले नाही. एसटी महामंडळाने ज्या ठेकेदाराला हे काम दिले होते त्या ठेकेदाराकडून काम तात्काळ करून घ्यावे असे निवेदन आंबोली शिवसेनेच्या वतीने (उद्धव ठाकरे पक्ष) देण्यात आले.या निवेदनावर विभाग अध्यक्ष बबन गावडे,सत्यवान गावडे,नारायण (बाळा) कोरगावकर,अनिल चव्हाण,बुधाजी(संतोष) पाताडे, प्राध्यापक मधुकर मनोहर गावडे, अनिल गावडे,सुशील तावडे,फ्रान्सिस फर्नान्डीस,शशिकांत सावंत,काशीराम राऊत,प्रथमेश गवंडे यांच्या सह्या आहेत.आंबोली प्रभारी बस स्थानक प्रमुख अनिल गावडे यांच्याकडे सावंतवाडी आगार साठी हे निवेदन देण्यात आले आहे.
