बांदा : प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही काणेकर कुटुंबियातर्फे कोजागिरी पोर्णिमा निमित्त बुधवार १६ ऑक्टोबर रोजी श्री साईबाबांचा उत्सव साजरा होत आहे. यंदा या उत्सवाला ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त बुधवारी सकाळी १० वाजता श्री साईबाबांची महापूजा, दुपारी १२ वा. श्री साईबाबांची आरती, १ ते ३ वाजेपर्यत महाप्रसाद, संध्याकाळी ४ वाजल्यापासून तीर्थप्रसाद, रात्री ९ वा. पहिल्या सत्रात गोव्यातील नामवंत भजनी कलाकार पांडुरंग राऊळ, विठ्ठल शिरोडकर, प्रल्हाद गवस यांचा पारंपारीक भजनाचा कार्यक्रम होईल. त्याना मिलिंद परब व जिग्नेश पेडणेकर तबला तर नितीन शिरगांवकर संवादिनी साथसंगत करतील.
दुसऱ्या सत्रात रात्री ११ वा. ऋषिकेश बडवे (पुणे) यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. त्यांना तबला साथ पं. तुळशीदास नावेलकर आणि संवादीनी साथसंगत राया कोरगावकर हे करतील. तिसऱ्या सत्रात गोव्यातील गायक ओंकार चारी यांचा उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना साथसंगत तबला साथ संकेत खलप आणि संवादिनी साथसंगत सुनाद कोरगावकर हे करतील. साई भक्त व संगीत प्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन काणेकर कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
