राजन तेलींचा व्हाट्सअप स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत..
⚡सावंतवाडी ता.०८-: भाई उठा उठा निवडणूक आली खोटे आश्वासन द्यायची वेळ झाली असा स्टेटस माजी आमदार राजन तेली यांनी ठेवला आहे. या स्टेटस च्या माध्यमातून पुन्हा एकदा मंत्री दीपक केसरकर यांना अप्रत्यक्षरीत्या डिवचल आहे. लोकसभेपूर्वी त्यांनी असाच स्टेटस ठेवला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा एकदा ठेवलेला हा स्टेटस चर्चेचा विषय बनला आहे.
