Headlines

मळगाव शारदा विद्यालय प्रशालेत उद्या शारदोत्सव…

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उद्या गुरुवार १० ऑक्टोबर रोजी शारदोत्सव साजरा होत आहे. यनिमित्त प्रशालेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यनिमित्त १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वाजता पूरोहिताच्या साक्षीने शारदा पूजन, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १.०० ते २.०० वाजता महाप्रसाद होणार असून दुपारी ३.०० ते ६.०० वाजता विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम, रात्री ७.०० ते ८.०० वाजता महिलांच्या फुगड्या व ग्रामस्थांचे भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता वाजतगाजत सरस्वती देवीचे विसर्जन होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळेच्यावातीने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page